नेरे येथे बँक ऑफ इंडिया शाखेत खातेदारांची गैरसोय

। नवीन पनवेल । वार्ताहर ।
नेरे येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत खातेदारांची गैरसोय होत असल्याचे दिसून येत आहे. खातेदारांची होणार्‍या गैरसोईबाबत लवकरात लवकर लक्ष घालून समस्या सोडवावयात अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रोषाला सामोरे जावे लागेल अशा आशयाचे निवेदन शाखा अधिकारी बँक ऑफ इंडिया शाखा नेरे याना देण्यात आले आहे.

शाखेमधील बरेचसे खातेदार हे आदिवासी अशिक्षित आहेत. ज्यांना लिहिता वाचता येत नाही. त्यामुळे त्यांची पैसे भरणे व काढण्याची गैरसोय होत आहे. तरी त्यांची होणारी गैरसोय टाळण्याकरीता एक मदतनीस नेमण्याची मागणी केली जात आहे. शाखेच्या बाहेर मुख्य रस्त्यालगत एटीएम मशिन आहे. ती मशिन ब-याच वेळा कार्यन्वीत नसते. मागील पाच ते सहा दिवसांपासून मशिनला शटर लावून ती बंदच ठेवलेली आहे. त्यामुळे खातेदारांची अतिशय गैरसोय होत आहे. त्याचा परिणाम म्हणून खातेदार बँकेमध्ये धाव घेतात. तरी सदरची एटीएम मशिन खातेदारांसाठी लवकरात लवकर कार्यन्वीत करावी.

तसेच शाखेमध्ये पैसे भरणे व काढणे यासाठी एकच काउंटरची सुविधा असल्यामुळे खातेदारांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागते. तरी पैसे भरणे व काढणे. यासाठी दोन स्वतंत्र काउंटर उघडावे. वरिल होणा-या गैरसोईबाबत आपण लवकरात लवकर लक्ष घालून समस्या सोडवाव्यात अशी मागणी मनसेचे विश्‍वास पाटील, कुणाल फडके,दिनेश मांडवकर, विदयाधर चोरघे यांनी केली आहे.

Exit mobile version