मुरूड समुद्रकिनारी पार्किंगची असुविधा; पर्यटन व्यवसायावर परिणाम

| मुरूड | प्रतिनिधी |

मुरुड जंजिरा किल्ला पाहण्यासाठी पुन्हा एकदा पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे. जंजिरा किल्ला पाहिल्यानंतर पर्यटक मुरूड समुद्रकिनारी फिरण्यासाठी थांबतात; परंतु या ठिकाणी पार्किंगची असुविधा असल्या कारणाने पर्यटक न थांबता निघून जातात. याचा फटका समुद्रकिनारी असलेल्या पर्यटन व्यवसायाला बसत आहे. तरी लवकरात लवकर पार्किंगची सुविधा उपलब्ध करावी, अशी मागणी पर्यटक व स्थानिक व्यावसायिक करत आहेत.

दिवाळीच्या सुट्टीत दोन वर्षांनंतर पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, नगर, सोलापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व महाराष्ट्र व महाराष्ट्रच्या बाहेरील पर्यटक दाखल होऊ लागले आहेत. ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी पुन्हा एकदा पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे. किल्ला पाहून झाल्यावर मनसोक्त आनंद घेण्यासाठी मुरूड समुद्रकिनारी पर्यटक येत आहेत. पण, पार्किंगच्या असुविधेमुळे पर्यटक किनार्‍यावर थांबत नाहीत. त्यामुळे स्थानिक पर्यटन व्यवसायाला याचा आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे लवकरात लवकर पार्किंग सुविधा उपलब्ध करावी, अशी मागणी सर्व स्तरातून पर्यटक व स्थानिक व्यावसायिक करत आहेत.

Exit mobile version