मिनीट्रेनची तिकिटे मिळत नसल्याने प्रवाशांची गैरसोय

शटलसेवेचे वेळापत्रक बदलले
| नेरळ | प्रतिनिधी |
पर्यटकांची लाडकी मिनीट्रेन मधून एकदा तरी प्रवास करता यावा यासाठी पर्यटकांची विशेष आवड असते.मात्र नेरळ येथून माथेरान आणि माथेरान येथून नेरळ अशी थेट प्रवासी सेवेच्या केवळ दोनच गाड्या या मार्गावर चालविली जात आहेत. दुसरीकडे अमन लॉज रेल्वे स्थानकात या गाड्यांच्या ये जा वेळी कोणत्याही पर्यटक किंवा प्रवाशाला तिकीट मिळत नाही. त्यामुळे मिनीट्रेनच्या थेट प्रवासी सेवेमुळे प्रवाशांना अमन लॉज स्थानकात तिकीट मिळत नसल्याने प्रवासी या सेवेबद्दल नाराज आहेत.

नेरळ येथून माथेरान जाण्यासाठी असलेल्या ट्रेनचे तिकीट मिळविण्यासाठी पर्यटक स्थानकात तासनतास बसून असतात. अगदी तशीच परिस्थिती माथेरान स्थानकातून नेरळ येथे जाणार्‍या मिनीट्रेनच्या गाडीमधून तिकीट मिळविण्यासाठी पर्यटक थांबून असतात. परंतु त्याचा फटका थेट प्रवाशांना बसत आहे. थेट मार्गावर चालवल्या जाणार्‍या मिनीट्रेनच्या फेर्‍यामुळे या मार्गावरील शटल सेवेचे वेळापत्रक बदलले आहे.शटल सेवेच्या दुपारच्या फेर्‍यांमध्ये त्यामुळे बदल झाला असून शनिवार रविवार वगळता अन्य दिवशी मिनीट्रेनचे शटल सेवेचे वेळापत्रक बदलले आहे. त्यात नेरळ येथून सकाळी ज्या दोन प्रवासी गाड्या माथेरान साठी रवाना होतात त्या गाड्यांमध्ये प्रवासी खचाखच भरलेली असल्याने अमन लॉज स्थानकात त्यातील एकाही गाडीमधून माथेरान स्थानकात जाण्यासाठी जागा शिल्लक नसते आणि त्यामुळे तिकीट देखील अमन लॉज स्थानकातून मिळत नाही.तीच स्थिती माथेरान स्थानकातून अमन लॉडघे स्थानक असा प्रवास करणार्‍या प्रवासी पर्यटक यांच्यासाठी निर्माण झालेली असते.त्यामुळे मिनीट्रेन नेरळ येथून माथेरान साठी जाणार्‍या ट्रेनचे तिकीट अमन लॉज स्थानकात मिळत नाही आणि त्याचवेळी अमन लॉज स्थानकातून नेरळ येथे जाण्यासाठी देखील कोणत्याही प्रवाशाला तिकीट मिळत नाही.अगदी तशीच स्थिती माथेरान स्थानकातून नेरळ कडे जाणार्‍या गाडी मधून अमन लॉज स्थानकी असा प्रवास करण्यासाठी तिकीट मिळत नाही.त्यामुळे मध्य रैवळायच्या या नियोजनाचा फटका पर्यटक प्रवाशांना बसत आहे.
अमन लॉज स्थानक निर्मितीचा उद्देश बाजूला.

ब्रिटिश काळात मिनीट्रेन सुरु झाली त्यावेळी तेथे असलेल्या अमन लॉज बंगल्यावरून अमन लॉज स्थानक हे स्टेशन निर्माण केले गेले.त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाने पर्यटन विश्रामगृह बांधले.त्यामुळे तेथे येणारे पर्यटक हे शक्यतो मिनीट्रेन चा प्रवास करून नेरळ स्थानकातून यात असत. आता मात्र अमन लॉज स्थानकात तिकीट मिळणे कठीण होऊ न बसले आहे. त्यामुळे एमटीडीसी चा रिसॉर्ट हे समीकरण बाजूला पडले आहे.

पर्यटन विश्रामगृहात जाण्याची अडचण
महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाचे विश्रामगृह माथेरान मध्ये आहे,परंतु ते दस्तुरी परिसरात असून त्या ठिकाणी जाण्यासाठी पर्यटकांना मिनीट्रेन मधून प्रवास करून यायचे असल्यास अमन लॉज स्थानकात उतरावे लागते. मात्र मिनीट्रेन मधून प्रवास करताना अमन लॉज अशी तिकीट मिळत नसल्याने पर्यटक प्रवासी नाराज नाराज आहे.शासनाच्या या विश्रामगृहात राहण्यासाठी येणारे पर्यटक यांना विश्रामगृह येथे पोहचण्यासाठी आपल्या सोबत असलेल्या बॅगा आणि चिल्ली पिल्ली मंडळी यांना सांभाळत लाल मातीच्या रस्त्याने यावे लागते.


शटल सेवेवर परिणाम …
मिनीट्रेनच्या थेट सेवेमुळे दुपारनंतर अमन लॉज आणि माथेरान स्थानकात सोडल्या जाणार्‍या शटल सेवेच्या गाड्यांचे वेळापत्रक बदलले आहे.त्या बदललेल्या वेळापत्रकामुळे माथेरान स्थानकातून अमन लॉज कडे येणार्‍या प्रवाशांना गाड्या उपलब्ध नसल्याने अन्य मार्गांचा अवलंब करून प्रवास करावा लागतो.


शटल सेवा माथेरान स्थानक येथून अमन लॉज
सकाळी 8.20,9.10,10. 05,शनी- रवी 10.35,11.35,शनी रवी दुपारी 1. 10,2. 00,3.15, सायं 5.20
अमन लॉज ते माथेरान
सकाळी 8.45,9.35 शनिवार रविवार 10. 30,दुपारी 12.00, 1. 35,2.25,3.40,सायं 5.42.
नेरळ माथेरान नेरळ सेवा …..
नेरळ ते माथेरान
सकाळी 8.50,10.25
माथेरान येथून नेरळ
दुपारी 2.45,4.00

Exit mobile version