पदवीधर मतदारांमध्ये वाढ

आतापर्यंत 23 हजार340 मतदारांची नोंदणी

| अलिबाग | प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यात पदवीधर मतदार नोंदणी आतापर्यंत 23 हजार 340 इतकी झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेने यंदा तीन हजार 422 ने मतदार वाढले आहेत. या नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे निवडणूक शाखेकडून सांगण्यात येत आहे.

रायगड जिल्ह्यात उपजिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत पदवीधर मतदान नोंदणी अभियान सुरु करण्यात आले आहे. पदवीधर मतदार नोंदणीसाठी पदवी किंवा पदवी समकक्ष धारण केलेली गुणपत्रिका किंवा पदवी प्रमाणपत्र, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, शिधापत्रिका अथवा वीज बिल, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र आदी कागदपत्रांची आवश्यक आहे. पथनाट्य, महाविद्यालय व अन्य ठिकाणी शिबीर घेऊन पदवीधर मतदान नोंदणी केली जात आहे. या अभियानाला रायगड जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 23 नोव्हेंबरच्या प्रारुप मतदारयादीनुसार आतापर्यंत 23 हजार 340 मतदारांनी नोंदणी केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. गतवर्षी रायगड जिल्ह्यामध्ये 19 हजार 918 पदवीधरांनी नोंदणी केली होती. पदवीधर मतदार नोंदणी वाढविण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली असून जिल्ह्यातील वेगवेगळ्या महाविद्यालयात जाऊन तरुणांपर्यंत मतदार नोंदणीबाबत जनजागृती करण्यात आली. त्याला तरुणांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

Exit mobile version