बंद पडणार्या गाड्यांमुळे अपघाताचा धोका
| नागोठणे | वार्ताहर |
नागोठणे-रोहा राज्य मार्गावरील नागमोडी वळणे असलेल्या धोकादायक भिसे खिंडीत ओव्हरलोड अवजड वाहने बंद पडण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. भिसे खिंडीतील दोन्ही बाजूकडील चढावावरच असलेल्या धोकादायक वळणावर ही वाहने बंद पडत असल्याने चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे या अवजड वाहनांवर पेण येथील उपप्रादेशिक परिवहन खात्याच्या अधिकार्यांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी वाहन चालक व प्रवासी वर्गातून होत आहे.
दरम्यान गुरुवारी (दि.28) दुपारी इंजिन लॉक होऊन भिसे खिंडीत धोकादायक वळणावर बंद पडलेला ठाणे आरटीओ पासिंगचा एम.एच.04, इएल 3326 या क्रमांकाचा ट्रक शुक्रवारी (दि.29) दुपारपर्यंत तसाच उभा असल्याने आरटीओ व वाहतूक पोलीस प्रशासन अपघाताची वाट पाहात आहेत का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
डोलवी (ता.पेण) येतील जेएसडब्ल्यू कंपनीच्या धरमतर येथील जेट्टीवर उतरण्यात येणार्या कच्चे लोखंड असलेल्या खडीची (गोटी) डंपरमधून नागोठणे, भिसे खिंड मार्गे जेएसडब्ल्यू कंपनीच्या साळाव येथील प्लांटमध्ये वाहतूक करण्यात येत आहे. त्यानंतर तेथे या खडीवर प्रक्रिया करुन पुन्हा ती खडी कंपनीच्या डोलवी येथील प्लांटमध्ये पक्का माल तयार करण्यासाठी आणण्यात येत आहे. ही सर्व ओव्हरलोड अवजड वाहतूक नागोठणे-रोहा मार्गावरील भिसे खिंड मार्गेच होत आहे.
भिसे खिंडीत वळणावर वारंवार बंद पडणार्या अवजड वाहनांमुळे सद्यःस्थितीत इथून प्रवास करणे अत्यंत धोक्याचे झाले आहे. ही वाहने वळणावरच बंद पडत असल्याने समोरून येणारी वाहने दिसत नाहीत. त्यामुळे दोन वाहनांमध्ये समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण होत आहे. मध्यंतरी अशा ओव्हरलोड वाहनांवर पेण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून कारवाई करण्यात आली होती. मात्र, आता पुन्हा ही अवजड ओव्हरलोड वाहतूक भिसे खिंडमार्गे मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याने या अवजड वाहनांवर कायमस्वरूपी ठोस कारवाई करण्यासाठी पेण उपप्रादेशिक परिवहन खाते चालक व प्रवाशांच्या मृत्यूची वाट पाहात आहे का? तसेच पेण आरटीओचे यामध्ये अर्थपूर्ण संबंध आहेत का? असे प्रश्न उपस्थित करून नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
जुन्या गाड्यांच्या फिटनेसचा प्रश्न
प्रादेशिक परिवहन विभागाच्या नवीन नियमानुसार अवजड वाहनांसाठी दर दोन वर्षांनी तपासणी करून फिटनेस सर्टिफिकेट देण्यात येते. ज्यावेळी ही वाहने आरटीओकडे तपासणीसाठी येतात, त्यावेळी मालक आपल्या वाहनांची वरवर रंगरांगोटी करून आणत असतात. मात्र, वाहनातील तांत्रिक दोष तसेच राहात असल्याने वाहने नादुरुस्त असूनही आरटीओ कार्यालयाबाहेर असलेल्या एजन्टमार्फत अधिकार्यांची सेटिंग करून नादुरुस्त