| मुंबई | प्रतिनिधी |
अर्थसंकल्पाआधी सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याऐवजी खिशाला चांगलीच कात्री लागली आहे. याचे कारण म्हणजे देशाची राजधानी ते आर्थिक राजधानी महागाईनं सर्वसामान्य नागरिक होरपळत आहे. गाडी चालवण्यापासून ते गृहिणींपर्यंत म्हणजे अगदी स्वयंपाकघरापर्यंत सगळ्याचे दर हे अक्षरश: गगनाला भिडले आहेत. त्यात आता भर म्हणून महानगर गॅस लिमिटेडने नवे दर लागू केले असून, 9 जुलैपासून सर्वत्र लागू झाले आहेत. त्यानुसार गॅसच्या किमतीतील वाढ अंशतः पूर्ण करण्यासाठी, एमजीएलने सीएनजीच्या किमतीत 1.50 रुपये प्रतिकिलो आणि घरगुती पीएनजीव्या किमतीत 1 रुपये प्रति स्टँडर्ड क्यूबिक मीटर मुंबई आणि आसपास वाढ केली आहे. या वाढीनंतर सीएनजीची सुधारित किंमत सर्व करांसह 75 रुपये प्रतिकिलो होईल. तर मुंबई आणि आसपासच्या देशांतर्गत पीएनजीची किंमत 48 रुपये प्रतिकिलो किंमत असेल.