शेतात सोनेरी पीके लागली डोलू

| आगरदांडा | प्रतिनिधी |

मुरुड पंचक्रोशी भागात भात हे प्रमुख उत्पादन आहे. यंदा पाऊस चांगला पडल्याने भात पिकाला पाऊस पोषक ठरला त्यामुळे शेतातील भाताची सोनेरी रोपे आता डोलू लागली आहेत. त्यामुळे यंदा भातपीकात वाढ होण्याची शक्यता असल्याने बळीराजा सुखावला आहे.

मुरूड तालुक्यात 3900हेक्टर क्षेत्रात भात पिकासाठी लागवड केली जाते. यंदा त्यापैकी 90टक्के भात पिकांची लागवड करण्यात आली होती. सुरवातीलाचं पावसाने पाठ फिरवल्याने बळीराजा प्रचंड तणावाखाली होता. दुबार पिक करायला लागतंय का हा मोठा प्रश्न बळीराजा समोर होता. जुलैच्या पहिल्या आठवड्यात वरुणराजाने ऐवढी कृपादृष्टी दाखवली की भात शेती पिक पुर्णतः पाण्याखाली गेली पुन्हा शेतकरी तणावखाली होता. काही दिवस पावसाने पुन्हा पाठ फिरवल्याने भात उत्पादक शेतकरी चिंतेत होता. यंदा पावसाच्या खेळखंडाबात शेतकरी पुर्णतः खचुन गेला होता. गणपतीच्या आगमनासह वरुणराजाने ही दमदार आगमन झाले.त्यामुळे शेतातील पिके तरारली अन बळीराजाचा चेहराही आनंदाने खुलुन गेला. पावसाच्या पुनरागमनातंर गेल्या आठवड्यापासून पडणारा पाऊस भात पिकाला पोषक ठरला. त्यामुळे भाताची सोनेरी रोपे तरारुन आली. ही रोपे वा-यावर डोलु लागली आहेत. मुरुड पंचक्रोशी भागात सरास शेतकरी आपल्या शेतात सुवर्णा, जया, चिंटू हे पीक घेतले जातो. हे पीक पुढील महिन्यात पुर्णतः तयार होईल. सोनेरी दाणा आपल्या आर्थिक परिस्थिती चांगली भरभराट करेल अशी आशा येथील शेतकरी करीत आहे.

Exit mobile version