| रत्नागिरी | प्रतिनिधी |
परतीबरोबरच अवकाळी पावसाने निरोप घेतल्यानंतर आता तापमानात ऑक्टोबर हीट जाणवू लागली आहे. पुढील दोन दिवस पावसाची उघडीप राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
पुढील काही दिवस किनारपट्टी भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मागील दोन दिवस रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांश भागात सकाळी तापमान 29 अंश होते. दुपारी साडेबारा वाजता 30 अंश सेल्सियसएवढे तापमान नोंदविले. तापमान वाढल्याने उष्मा जाणवू लागला आहे.