| तळा | प्रतिनिधी |
गेल्या तीन दिवसांपासून रिमझिम कोसळणाऱ्या पावसाने सोमवारी मुसळधार कोसळत तळा तालुक्याला झोडपले. यामुळे तालुक्यातील नद्यांच्या पातळीत वाढ झाली असून, प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास तालुक्यातील नद्यांना पूर येऊन गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच पुलावरून पाणी जात असल्यास पुलावरून प्रवास करू नये, नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, घरामध्ये पाणी शिरून पाण्याची पातळी वाढत असल्यास तात्काळ घर सोडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, आपल्या पाळीव प्राण्यांना अगोदरच सुरक्षित स्थळी स्थलांतरित करावे, मुसळधार पावसामुळे घराच्या आजूबाजूला विजेचे खांब,विद्युत वाहिनी, झाडे पडण्याची शक्यता असल्याने आशा गोष्टींपासून लांब राहावे तसेच आपत्कालीन मदत आवश्यक असल्यास ग्रामपंचायत, नगरपंचायत किंवा तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनदेखील करण्यात आले आहे.
तालुक्यातील नद्यांच्या पातळीत वाढ
