कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ; 24 तासांत 4270 नवे रुग्ण, 15 जणांचा मृत्यू

। मुंबई । वृत्तसंस्था ।
देशभरात कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं आहे. गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे प्रशासन अलर्टवरती आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये देशात नव्या 4270 कोविड रुग्णांची नोंद झाली, तर 2619 रुग्ण बरं होऊन घरे परतले. गेल्या चोवीस तासांमध्ये 15 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सध्या देशभरात 24,052 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहे. राज्यात काही भागांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर मास्क सक्ती करण्यात आल्याचं वृत्त माध्यमांनी दिलं होत. पण कोणत्याही प्रकारे मास्क सक्ती करण्यात आलेली नाही. मास्क वापरण्याचं केवळ आवाहन करण्यात आलं आहे, असं स्पष्टीकरण आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलं आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. टोपे म्हणाले, आपल्या राज्यात काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या थोड्या प्रमाणात वाढत आहे. यामध्ये मुंबई, पुणे, पालघर आणि रायगड, ठाणे आहे. यामध्ये जी संख्या वाढत आहे. त्या संख्येमुळं केंद्रीय आरोग्य विभागानं आम्हाला एक पत्र पाठवलं की या जिल्ह्यांपुरत्या तुम्हाला उपाययोजना कराव्या लागतील.

Exit mobile version