एक्स्प्रेस वेवरील टोल दरात वाढ

| मुंबई | प्रतिनिधी |

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवरील प्रवास आणखी महागणार आहे. कारण,या मार्गावरील टोलच्या दरांमध्ये लवकरच वाढ होणार आहे. 1 एप्रिल 2023 पासून द्रुतगती मार्गावरून प्रवास करणार्‍यांना टोलसाठी 18 टक्के अधिक रक्कम मोजावी लागणार आहे. 2004 साली सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या टोलमध्ये दर तीन वर्षांनी 18 टक्के वाढ करण्याची अधिसूचना काढण्यात आली होती. त्यानुसार, 2023 मधील टोलच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी 1 एप्रिल 2020 मध्ये अशीच वाढ झाली होती. मात्र 1 एप्रिल 2023 ला लागू होणारे टोलचे दर हे 2030 पर्यंत कायम असतील, असे एमएसआरडीसी कडून सांगण्यात आलं. यंदा किमान सध्याच्या दरापेक्षा 50 ते 70 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

Exit mobile version