ठाणे विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्रांची वाढ

| ठाणे | प्रतिनिधी |

लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या वेळी झालेला विलंब, मतदान केंद्रांवर लागलेल्या लांबच लांब रांगा यामुळे अनेक मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले होते. ही बाब लक्षात घेत ठाणे जिल्हा निवडणूक विभागाने विधानसभा निवडणुकीच्या वेळी असा गोंधळ पुन्हा उडू नये, यासाठी मतदान केंद्रांच्या संख्येत 297ने वाढ केली आहे. यामध्ये सर्वाधिक 46 मतदान केंद्रे ही ठाणे विधानसभा मतदारसंघात वाढविण्यात आल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे.

ठाणे जिल्ह्यात तीन लोकसभा मतदारसंघ तर 18 विधानसभा मतदारसंघ आहेत. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या वेळी वयोवृद्ध मतदारांना होणारा त्रास व त्यांची होणारी गैरसोय लक्षात घेता, दुसर्‍या, तिसर्‍या मजल्यावरील मतदान केंद्र हे तळ मजल्यावर आणले होते; मात्र लोकसभा निवडणुकीच्या वेळी मतदान केंद्रांच्या बाहेर लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. तर, अनेक मतदान केंद्रांवर मतदारांची संख्यादेखील अधिक असल्याचे समोर आले. यामुळे अनेक मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले होते. याची गांभीर्याने दाखल घेत विधानसभा निवडणुकीत लोकसभा निवडणुकीवेळी झालेल्या गैरसोयीची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी ठाणे जिल्हा निवडणूक विभागाने मतदान केंद्रांच्या संख्येत 297ने वाढ केली आहे. यात ठाणे विधानसभा मतदार संख्या सर्वाधिक 46 मतदान केंद्रांची वाढ झाली आहे. मतदान केंद्रांची संख्या पोहोचली सहा हजार 894 वरठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांची संख्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी सहा हजार 391 इतकी होती. मतदान केंद्रांवर लागणार्‍या लांबच लांब रांगा, मतदानासाठी लागणारा वेळ, यामुळे अनेक मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले होते. त्यामुळे यंदा विधानसभा निवडणुकीसाठी 297 मतदान केंद्रांची वाढ केल्यामुळे जिल्ह्यातील मतदान केंद्रांची संख्या थेट सहा हजार 894 वर पोहोचली आहे.

159 सोसायटीमध्ये 337 मतदान केंद्रे
ठाणे जिल्ह्यातील सोसायटीमध्ये राहणार्‍या नागरिकांची मतदानातील टक्का वाढवा, यासाठी त्यांच्या सोसायटीतच मतदान केंद्रांची उभारणी करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. 159 सोसायटींमध्ये 337 मतदान केंद्रांची उभारणी केली असून, 53 स्लम परिसरात 252 मतदान केंद्रे उभारली आहेत.
Exit mobile version