उरण तालुक्यात शेकापची ताकद वाढविणार

मेघनाथ तांडेल चिटणीस यांचा शब्द
। उरण । वार्ताहर ।
उरण तालुका शेतकरी कामगार पक्षाची मीटिंग उरण येथे पक्ष कार्यालयात कोटनाका येथे संपन्न झाली. या सभेमध्ये तालुका चिटणीस मेघनाथ तांडेल यांनी उरणमध्ये शेकापची ताकद वाढविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न आपण करणार आहोत असे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी तालुका चिटणीस प्रमुख मार्गदर्शन करताना म्हणाले, उरण तालुक्यातील पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी गावोगावी सभा घेण्यात येतील. पक्षाच्या विभागानुसार कमिटी स्थापन करण्यात येईल. उरण तालुक्यात आ.बाळाराम पाटील यांच्या माध्यमातून एस.इ.ओ.च्या नेमणुका केल्या जाणार आहेत. उरण नगर परिषदेच्या निवडणूक अनुषंगाने प्रभागात सभा घेतल्या जाणार आहेत. तरी संभाव्य उमेदवार यांनी आपल्या प्रभागात कामाला लागून उरण शहरात शेकापची ताकद दाखवून द्या. तसेच शेकापला नवसंजीवनी देण्यासाठी विकासकामांवर भर देणार असून तरुणांना प्राधान्य दिले जाणार आहे.
यावेळी सभापती अ‍ॅड.सागर कडू, उपसभापती वैशाली पाटील, सभापती नरेश घरत, महिला अध्यक्षा सीमा घरत, जिप सदस्य जीवन गावंड, सहसचिव यशवंत ठाकूर, पं.स.सदस्य महेश म्हात्रे, पुरोगामी युवक संघटना अध्यक्ष रमाकांत म्हात्रे, युवा नेते निलेश म्हात्रे, फुंडे सरपंच कविता म्हात्रे, कार्यालयीन चिटणीस नयन म्हात्रे, चाणजे उपसरपंच प्रदीप नाखवा, ज्येष्ठ नेते मोरेश्‍वर भोईर, रमाकांत पाटील, जीवन पाटील, राकेश पाटील, नितीन ठाकूर, चिरले सरपंच दीपक मढवी, किशोर घरत आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version