आयपीएलच्या व्यावसायिक मुल्यात वाढ

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सने विजेतेपद पटकावले. शाहरूख खान या फ्रेंचायजीचा मालक असून या संघाने तिसर्‍यांदा आयपीएलवर आपले नाव कोरले आहे. गेल्या काही वर्षापासून आयपीएलची व्यावसायिक मुल्य चांगलेच वाढले आहे. हौलीहान लॉकी या ग्लोबल इनव्हेस्टमेंट बँकेने आपल्या मागील आहवालात आयपीएलचे व्यासायिक मुल्य हे 6.5 टक्क्यांनी वाढले असल्याचे सांगितले. तर ब्रँड व्हॅल्यू ही 6.3 टक्क्यांनी वाढली आहे. विशेष म्हणजे या अहवालात आयपीएलमधील फ्रेंचायजींच्या ब्रँड व्हॅल्यूचीदेखील माहिती दिली आहे. यात मुंबई इंडियन्स किंवा आरसीबी या स्टार संघाची ब्रँड व्हॅल्यू जास्त असेल असे वाटते मात्र तसे नाही आहे.

बँकेच्या प्रेस रिलीजमध्ये सांगण्यात आले आहे की, महौलीहान लॉकी इंडियाने आज आयपीएलच्या ब्रँड व्हॅल्यूबाबतचा अभ्यास प्रकाशित केला आहे. हा आयपीएलच्या व्यावसायिक आणि ब्रँड व्हॅल्यूचा सखोल अभ्यास आहे. बँकेच्या अहवालानुसार, आयपीएलचे व्यावसायिक मुल्य हे 16.4 बिलियन युएस डॉलरपर्यंत पोहचले आहे. हे मुल्य गेल्या वर्षीच्या तुलनेत 6.5 टक्क्यांनी वाढले. भारतीय रूपयात याचे मुल्य 1 लाख 35 हजार कोटींच्या जवळ पोहचते. यावरून आयपीएलची जागतिक स्तरावरील वाढती ताकद दिसून येत आहे. याचबरोबर आयपीएलची ब्रँड व्हॅल्यूदेखील 6.3 टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ती 3.4 बिलियन डॉलर म्हणजे 28 हजार कोटींपर्यंत पोहचली आहे.

Exit mobile version