चिऊताईंच्या प्रचाराला वाढता प्रतिसाद

मारुती मंदिराच्या प्रांगणात प्रचाराचा शुभारंभ

। अलिबाग । प्रतिनिधी ।

महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांचा गेल्या अनेक दिवसांपासून मतदारसंघात प्रचार सुरु आहे. त्यांच्या प्रचाराला वाढता प्रतिसाद दिसून येत आहे. मतदारांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. खंडाळे ग्रामपंचायत हद्दीतील सागाव येथील मारुती देवस्थान मंदिरात जाऊन गुरुवारी (दि. 7) जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील यांच्या हस्ते प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. दरम्यान, मारुतीचे दर्शन घेत प्रचाराला सुरुवात करण्यात आली. सागाव, तळवली, खंडाळे परिसरातील असंख्य कार्यकर्ते, महिला या प्रचारात सहभागी झाल्या होत्या.

यावेळी शैला पाटील, साधना पाटील, खंडाळेचे सरपंच नासिकेत कावजी, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष विलास वालेकर, माजी सरपंच संतोष गुरव, माजी उपसरपंच विनोद पाटील, माजी सदस्य नरेश गोंधळी, सदस्य संदेश पाटील, रुचिता भगत, माजी सरपंच नम्रता पाटील, सुचिता कावजी, माजी सदस्या समिक्षा पाटील, वैद्यही पाटील, सविता पाटील, वेश्‍वीचे माजी सरपंच प्रफुल्ल पाटील, उदय वेळे, विलास थळे, रवि पाटील, संकेत वेळे, किशोर खराडे, कल्पेश पाटील, दिनानाथ पाटील, अमोल किणगे, काँग्रेसचे भरत पाटील, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील प्रशांत पाटील, अनेश पाटील, माजी उपसरपंच विजय थळे, स्वप्नील पाटील, रामदास कावजी, विजया कुडव, अनंत वैद्य, मनोहर पाटील, विजय गायकवाड, हरिश्‍चंद्र पाटील आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, युवावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

प्रचाराला सुरुवात करण्याअगोदर सुप्रिया पाटील यांनी मारुतीचे दर्शन घेतले. त्यानंतर प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. ‘लढेंगे, जितेंगे, लाल बावटे की जय, महाविकास आघाडीचा विजय असो, चिऊ ताई तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणा देण्यात आल्या. कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळा उत्साह या प्रचाराच्या दरम्यान दिसून आला. चित्रलेखा पाटील यांना निवडून आणण्यासाठी कार्यकर्ते मतदारांपर्यंत पोहोचत आहे. घरोघरी जाऊन शिट्टी या चिन्हासमोरील बटण दाबून चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांना निवडून द्या, असे आवाहन मतदारांना करण्यात आले आहे. तळवली गावात जाऊन मतदारांच्या घरोघरी जाऊन कार्यकर्त्यांनी प्रचार केला. ज्येष्ठ कार्यकर्त्यांबरोबरच युवा नेतृत्वदेखील या प्रचारात स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते.

Exit mobile version