रायगडात घरोघरी तिरंगा अभियानास वाढता प्रतिसाद

जेेएसएम महाविद्यालयातर्फे सामूहिक राष्ट्रगीत गायन

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त जेएसएम महाविद्यालयात मंगळवारी दि.9 क्रांतीदिनी सामूहिक राष्ट्रगीत गायनाच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यामुळे संपूर्ण परिसर राष्ट्रगीताच्या सुरांनी पूर्णपणे दुमदुमला. यावेळी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. गौतम पाटील, प्राचार्य डॉ. अनिल पाटील, उपप्राचार्य डॉ. नीळकंठ शेरे, डॉ. सोनाली पाटील, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. पी. बी. गायकवाड, डॉ. मीनल पाटील डॉ. सुनील आनंद, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक, राष्ट्रीय छात्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एनसीसी ऑफिसर कॅप्टन डॉ. मोहसीन खान यांनी सामूहिक राष्ट्रगीत गायनासंबंधी आयोजन केले. तर प्रा. डॉ. पी. बी. गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले.

घरोघरी तिरंगा कार्यक्रमांतर्गत दिनांक 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत सर्व घरांवर तिरंगा फडकवण्यात येणार आहे. त्यासाठी महाविद्यालयात राष्ट्रीय ध्वज विक्रीकेंद्राचे उद्घाटन अ‍ॅड. गौतम पाटील यांच्या हस्ते आणि प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या केंद्रामधून प्राध्यापक, विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना ध्वज उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पृथ्वी व विज्ञान मंत्रालयाच्या स्वच्छ सागर सुरक्षित सागर अभियानाचा भाग म्हणून ज सर्व विद्यार्थ्यांना मस्वच्छ सागर व सुंदर सागरफ ही शपथ देण्यात आली. पुढील 18 ऑगस्टपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांनी यावेळी दिली.

Exit mobile version