| उरण | प्रतिनिधी |
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पबाधितांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सीबीडी बेलापूर येथील सिडको भवन कार्यालयासमोर सोमवारी दि.19 जानेवारीपासून आमरण उपोषणाला सुरुवात झाली आहे. या उपोषणाला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कमिटीचे संघटक किरण केणी व प्रविण मुठ्ठेनवार बसले आहेत. सिडको प्रशासनाने उपोषणकर्ते आंदोलक व त्यांच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा न केल्यास शुक्रवार दि.23 जानेवारीपासून इतरही प्रकल्पबाधित आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबणार आहेत. हे आमरण उपोषण प्रामुख्याने 2019 नंतर निष्कातीत झालेल्या घरांच्या घरमालकांना घरभाडे भत्ता व प्रोत्साहन भत्ता 500 रुपये द्यावा. शून्य पात्रता ठरवून सिडकोने जी घरे नाकारली आहेत त्या घरांना सुद्धा घरे मंजूर करा. 2013 च्या भूसंपादन कायद्याची अंमलबजावणी करुन मच्छिमारांना नुकसान भरपाई द्यावी. विमानतळ प्रकल्प बाधितांच्या मुलांना नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पात नोकऱ्या उपलब्ध करून देण्यात याव्यात, या मुख्य मागण्यांसाठी सुरू आहे.
विमानतळ प्रकल्पबाधितांचे आमरण उपोषण
