| अहमदनगर | वृत्तसंस्था |
दुधाला 34 रुपये भाव मिळावा. या मागणीसाठी, गेल्या 7 दिवसांपासून जनसंघर्ष समितीच्या वतीनं अकोले येथे शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण सुरु होते. बुधवारी अखेर या आंदोलकांनी उपोषण मागे घेतलं आहे. दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी फोनवर चर्चा झाल्यानंतर हे आमरण उपोषण मागे घेण्यात आले.
दूध दराच्या बाबतीत कोणताही तोडगा निघालेला नाही. फक्त बैठकीचं आश्वासनं देण्यात आलं असल्याची माहिती किसान सभेचे नेते डॉ. अजित नवलेंनी दिली. दुध दराच्या प्रश्नासंदर्भात दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्यासोबत अधिवेशना आधी बैठक होणार असल्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. सहकाऱ्यांची तब्बेत लक्षात घेत उपोषण मागे घेणं गरजेचं होते. सरकारनं आश्वासनापेक्षा निर्णय घ्यावा, असे नवले म्हणाले.
जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्या मध्यस्थीने उपोषण स्थगित करण्यात आलं आहे. संदीप दराडे आणि अंकुश शेटे यांनी सात दिवस हे उपोषणाला बसले होते. तर अजित नवले हे देखील या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी उपोषणाला बसले होते. त्यांनी चार दिवस बेमुदत उपोषण केले. बैठका घेण्याचा फार्स करण्यापेक्षा तातडीने शेतकऱ्यांना प्रतिलिटर 5 ते 10 रुपयांचे अनुदान द्यावे. तसेच दूध पावडर निर्यातीसाठी केंद्राकडून परवानगी घ्यावी, अशा प्रमुख मागण्या यावेळी नवले यांनी केल्या आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रक काढून उपोषणाला पाठिंबा दर्शवला होता.
. . . . . .






