उद्यापासून रेशन दुकानदारांचा बेमुदत संप

रायगडातील 11500 तर महाराष्ट्रातील 55000 दुकानदाराचा सहभाग

| माणगाव | वार्ताहर |

महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघाच्या वतीने ऑल इंडिया फेअर प्राईज शॉप डिलर फेडरेशनच्या वतीने राज्य व देश पातळीवर आंदोलनाचा निर्णय घेतला असुन या आंदोलनामध्ये रायगड जिल्हयातील सर्व तालुक्यातील रेशन दुकानदार सहभागी होणार आहेत. या आंदोलनाचा पहिला टप्पा दि.1 डिसेंबर 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यलयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करुन राज्य सरकारचे व जिल्हाधिकारी कार्यालयाचे लक्ष वेधले होते. तसेच सन्माननीय लोकप्रतिनिधींना व जनतेला आमच्या प्रश्‍नांची जाणीव व्हावी तसेच सरकारने तात्काळ दखल घ्यावी आणि जिल्हा प्रशासनाने आमच्या अडचणींचा शासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी आंदोलन करण्यात आली होती. आंदोलनाचा पुढचा टप्पा असुन आमच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून 1 जानेवारी 2024 पासून रायगडातील 11500 तर महाराष्ट्रातील 55000 दुकानदार बेमुदत संपावर जाणार आहेत. अशी माहिती रायगड जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार संघटना जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राज्यात व देशात अन्न सुरक्षा कायदयाअंतर्गत मोफत धान्य वितरण योजना सुरु झाल्यापासून राज्यातील रेशन दुकानदार त्रस्त झालेले असुन दुकानदारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे, दुकानदारांना प्रति क्विटल मिळणारे कमिशन रु.150 आहे ते किमान प्रति क्विटल रु.300 मिळावे व कमिशन प्रत्येक महिन्याला रेग्युलर मिळाचे, दुकानदारांना शासनाकडून दिलेल्या पॉज मशीन भंगार झाल्या असून सतत बंद पडतात त्यामुळे धान्य वितरणामध्ये अडचणी येतात. त्या तात्काळ बदलुन मिळाव्यात, ठेकेदाराकडून धान्य दुकानात वेळेत पोच केले जात नाही, मालामध्ये प्रति क्विटल दोन किलोची घट येते, येणारी घट भरुन मिळावी, रायगड जिल्हा पुरवठा विभागाकडून दुकानदारांच्या अडचणी सोडविल्या जात नाही. दुकानदारांना व पदाधिकार्‍यांना सन्मानाची वागणूक दिली जात नाही.

याबाबत जिल्हा प्रशासनाने योग्यती दखल घ्याची व दुकानदाराना सहकार्य करावे अशी मागणी रायगड जिल्हा अध्यक्ष रायगड जिल्हा रास्तभाव धान्य संघटना प्रमोद रा. घोसाळकर, रायगड जिल्हा कार्याध्यक्ष रायगड जिल्हा रास्तभाव धान्य संघटना चंद्रशेखर देशमुख, रायगड जिल्हयातील सर्व तालुका अध्यक्ष व सर्व रेशन दुकानदार यांनी केली आहे.

Exit mobile version