कर्जतच्या रायगड हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र नवीन रक्तपेढी मंजूर

नेरळ | वार्ताहर |
कर्जतमधील रायगड हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र नवीन रक्तपेढी मंजूर करण्यात आली असून,याचे लवकरच लोकार्पण केले जाणार असल्याचे डॉ. नंदकुमार तासगावकर यानी जाहीर केले.
रक्ताची कमतरता आणि कर्जत परिसरातील रुग्णांची गरज लक्षात घेत डॉ. नंदकुमार तासगावकर यांनी आपल्या सहकार्‍यांच्या सोबत रायगड हॉस्पिटल येथे जुलै 2021 मध्ये नवीन सुसज्ज अशी रक्तपेढी सुरु करण्याची संपल्पना सादर केली होती. त्यानंतर या विषयी सातत्याने पाठपुरावा करत राज्यशासन आणि केंद्र सरकार यांचे सर्व निकष आणि नियम यांची पूर्तता करत अंमलबजावणी केल्यानंतर 15 नोव्हेंबर 2021 रोजी सदर रक्तपेढी परवान्याला मुख्य औषध नियंत्रक, नवी दिल्ली यांची मान्यता मिळाली आहे.

नव्याने मंजूर झालेल्या रायगड हॉस्पिटल रक्तपेढीचे येणार्‍या महिन्यात उद्घाटन होणार असून हि रक्त पेढी सर्व सामान्यांच्या सेवेत दाखल होत असल्याने रुग्णांसह त्याचे नातेवाईक यांचा वेळ व अर्थिक बचत मोठ्या प्रमाणात होणार आहे.
डॉ. नंदकुमार तासगावकर
चेअरमन, रायगड हॉस्पिटल

Exit mobile version