उमेदवारांना मतदारांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद
| अलिबाग | प्रतिनिधी |
खंडाळे ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचसह सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी इंडिया आघाडीचे उमेदवार रिंगणात उतरले आहे. निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ जिल्हा परिषद माजी सदस्य संजय पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी सकाळी नारळ वाढवून करण्यात आला. सुरुवातीला सागाव येथील मंदिरातील हनुमानाचे दर्शन घेण्यात आले.
खंडाळे ग्रामपंचायतीची निवडणूक एकूण 14 जागांसाठी आहे. त्यात एक सरपंच व तेरा सदस्यांचा समावेश आहे. या निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीमधील थेट सरपंचपदाचे उमेदवार नासिकेत मधुकर कावजी, प्रभाग क्रमांक एकमधील सदस्यपदाचे उमेदवार निवास कृष्णा घरत, वंदना विलास नाईक, प्रभाग क्रमांक दोनचे उमेदवार रंजना रविंद्र नाईक, रजिता रविंद्र पाटील, प्रभाग क्रमांक तीनचे उमेदवार संकेत काशिनाथ वेळे, रुचिता प्रणय भगत, वैदेही विलास थळे, प्रभाग चारचे उमेदवार संदेश बंडू पाटील, राखी संतोष गुरव, सुमन नरेश मेंगाळ, प्रभाग पाचचे उमेदवार संकेत शंकर पाटील, सिध्दार्थ अनिल गोंधळी, निलिमा संतोष कावजी हे निवडणूक लढविणार आहेत.
त्यानिमित्ताने शनिवारी सकाळी सागाव मारुतीचे दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात करण्यात आली. यावेळी अनेक उमेदवारांना प्रत्यक्षात भेटून मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. या प्रचाराला मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.