भारताने केला अफगाणिस्तानचा पराभव

19 वर्षाखालील पुरुष तिरंगी क्रिकेट स्पर्धा

| जोहान्सबर्ग | वृत्तसंस्था |

दक्षिण आफ्रिकेत खेळल्या जात असलेल्या 19 वर्षांखालील पुरुषांच्या तिरंगी मालिकेत भारताने पहिल्या एकदिवसीय सामन्यात अफगाणिस्तानचा 6 गडी राखून पराभव केला. जोहान्सबर्गच्या मैदानावर भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अफगाणिस्तानला भारतीय गोलंदाजांसमोर पूर्ण 50 षटकेही खेळता आली नाहीत आणि 48.2 षटकात 197 धावांत सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात भारताने केवळ 36.4 षटकांतच लक्ष्याचा पाठलाग केला. भारताकडून सौम्य पांडेने 6 बळी घेतले, तर आदर्श शर्माने 112 धावांची नाबाद खेळी खेळून सामना संपवला.

अफगाणिस्तानसाठी हसन इसाखिल आणि वफीउल्लाह तरखिल यांनी सलामी बल्लेबाजी केली. तारखिल एकही धाव न काढता परतला. जमशीद झद्रान 26 धावा करून तिसऱ्या क्रमांकावर बाद झाला. तेथून पुढे एस्खिल आणि सोहेल खानने डाव सांभाळला. दोघांमध्ये अर्धशतकी भागीदारी झाली. एस्खिलने 54 धावांची तर सोहेलने 71 धावांची खेळी खेळली. या दोघांच्या विकेट्सनंतर अफगाणिस्तानचा डाव गडगडला.नुमान शाह आणि रहमानउल्ला झुरमती हे दोघेही पहिल्याच चेंडूवर बाद झाले. कर्णधार नसीरने 24 धावा केल्या. तर अल्लाह गझनफर आणि खलील अहमद यांना अनुक्रमे केवळ 2 आणि 1 धावा करता आल्या. बशीर अहमद 0 धावा करून नाबाद राहिला. भारताकडून फिरकीपटू सौम्य पांडेने शानदार कामगिरी करत 6 बळी घेतले. तर, राज लिंबानीने 2 आणि मुरुगन अभिषेकने 1 बळी घेतला.आदर्श सिंग आणि अर्शिन कुलकर्णी यांनी भारतासाठी सलामी दिली. अर्शीन 20 धावा करून बाद झाला.

आदर्श एका टोकाला राहिले. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या आर्वेली अविनाशलाही केवळ 7 धावा करता आल्या. तसेच, सचिन दास 2 धावा करून बाद झाला. कर्णधार उदय सहारन 1 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. भारताच्या 72 धावांत 4 फलंदाज बाद झाले होते. येथून मुशीरने आदर्शला साथ दिली आणि मोठी भागीदारी केली. आदर्शने 112 धावांची नाबाद खेळी खेळली. तर, मुशीर 39 धावा करून नाबाद राहिला. दोघांनी सहज सामन्याचा शेवट केला.अफगाणिस्तानकडून अल्लाह गझनफरने 2, तर नासिर हसन आणि बशीर अहमद यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.अंतिम सामना 10 जानेवारीलादक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान आणि भारत यांच्यात खेळल्या जाणाऱ्या 19 वर्षाखालील पुरुषांच्या तिरंगी मालिकेचा अंतिम सामना 10 जानेवारी 2024 रोजी जोहान्सबर्ग येथे होणार आहे. तिन्ही संघ एकमेकांविरुद्ध 2-2 सामने खेळतील. त्याचबरोबर या स्पर्धेचा अंतिम सामना अव्वल-2 संघांमध्ये होईल.

Exit mobile version