। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने 2036 च्या ऑलिम्पिक यजमानपदासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडे इच्छा व्यक्त केली. मिळालेल्या माहितीनुसार, 2036 मध्ये ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक खेळांचे आयोजन करण्याची भारताची इच्छा आहे, असे पत्र 1 ऑक्टोबर 2024 रोजी ऑलिम्पिक समितीला पाठवण्यात आले आहे. भारत सरकारला आशा आहे की, 2036 च्या ऑलिम्पिकचे आयोजन करण्याची संधी भारताला मिळेल आणि यामुळे संपूर्ण देशामध्ये आर्थिक वाढ, सामाजिक प्रगती आणि युवा सक्षमीकरणासाठी फायदा होईल.
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या वार्षिक सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2036 उन्हाळी ऑलिम्पिकच्या आयोजनासाठी भारत इच्छुक असल्याचे सांगितले.
भारत ऑलिम्पिक आयोजित करण्यासाठी खूप उत्सुक आहे. 2036 ऑलिम्पिक आयोजित करण्याच्या प्रयत्नांममध्ये भारत कोणतीही कसर सोडणार नाही. हे 140 कोटी भारतीयांचे स्वप्न आहे आणि आयओसीच्या पाठिंब्याने आम्हाला हे स्वप्न पूर्ण करायचे आहे. खेळ हा केवळ पदके जिंकण्यासाठी नसून मन जिंकण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. खेळ चॅम्पियन्ससोबतच आनंदही देतो. असे मोदी म्हणाले.