| बार्बाडोस | वृत्तसंस्था |
बार्बाडोसच्या मैदानात भारताने इतिहास रचला. 2007 नंतर भारतीय संघाने टी-20 विश्वचषकावर नाव कोरले आहे. विराट कोहली आणि अक्षर पटेल यांनी फलंदाजीमध्ये शानदार कामगिरी केली. गोलंदाजीमध्ये हार्दिक पांड्या, बुमराह आणि अर्शदीप यांनी शानदार गोलंदाजी केली. रोहित शर्मा 2007 आणि 2024 विश्वचषक जिंकणारा एकमेव खेळाडू ठरला आहे.
हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंह यांच्या भेदक गोलंदाजी पुढे दक्षिण आफ्रिकेने गुढघे टेकले. अखेरच्या चार षटकांमध्ये भारतीय गोलंदाजांनी सामना फिरवला. 24 चेंडूवर दक्षिण आफ्रिकेला 26 धावांची गरज होती. त्यावेळी हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, अर्शदीप यांनी भेदक मारा केला. त्याला जोड सूर्यकुमार यादवच्या क्षेत्ररक्षणाची मिळाली. सूर्यकुमार यादवने मोक्याच्या क्षणी डेविड मिलर याचा झेल घेतला. भारतीय संघाने 11 वर्षानंतर अखेर आयसीसी चषकावर नाव कोरले. टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव केला.