आशियाई चषक क्रिकेट स्पर्धा; भारत-पाकच्या समालोकचांही होणार वादावादी

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

अनेक वादांनंतर अखेर आशियाई चषत क्रिकेट स्पर्धा येत्या 30 ऑगस्टपासून सुरू होत आहे. क्रिकेट चाहते या स्पर्धेची चातकासारखी वाट पाहत आहेत. कारण याच स्पर्धेत भारत-पाकिस्तान यांचा हाय व्होल्टेज सामना होणार आहे. यंदा आशिया कप हा हायब्रीड पद्धतीने आयोजित केले जाणार आहे. आशिया कपचे 4 सामने हे पाकिस्तानमध्ये तर उर्वरित सामने हे श्रीलंकेत होणार आहेत.या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये केवळ मैदानाच नव्हे तर समालोचन विभागातही शाब्दिक लढत पहावयास मिळणार आहे.

या स्पर्धेसाठी एका पाठोपाठ एक देश आपला संघ जाहीर करत आहेत. त्याचबरोबर आशिया कपसाठी कोण कोण समालोचन करणार याची देखील यादी जाहीर झाली आहे. या यादीत भारताचे आणि पाकिस्तानचे काही दिग्गज माजी खेळाडू देखील आहेत. त्यामुळे मैदानाबरोबरच कॉमेंट्री बॉक्समधील वातावर देखील तापणार हे नक्की. स्पर्धेसाठी भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर सोबतच रवी शास्त्री, संजय मांजरेकर, इरफान पठाण आणि दीप दास गुप्ता देखील समालोचन करणार आहेत. तर पाकिस्तानकडून वसीम अक्रम, वकार युनिस, रमीझ राजा आणि बाजीद खान यांचा समालोचकांच्या यादीत समावेश आहे.

बांगलादेशचे अथर अली आणि श्रीलंकेचे रसेल अर्नोल्ड देखील समालोचन करताना दिसतील. न्यूझीलंडचा माजी अष्टपैलू खेळाडू स्कॉट स्टायरिस याचं देखील समालोचकांच्या यादीत नाव आहे. हे सर्व दिग्गज लाईव्ह सामन्यात आपल्या एक्सपर्ट कमेंटने चार चांद लावणार आहेत.

Exit mobile version