भारताला विश्‍वगुरूचे स्थान प्राप्त व्हावेः डॉ. भोसले

। आगरदांडा । प्रतिनिधी ।

मुरुड हिंदू एज्युकेशन सोसायटी व भोसला मिलिटरी एज्युकेशन सोसायटीचे समान उद्दिष्ट असुन शैक्षणिक क्षेत्राच्या मध्यमातून संस्कारक्षम माणूस व सशक्त समाज घडवुन या भारत भूमीला विश्‍वगुरु चे स्थान प्राप्त व्हावे असे प्रतिपादन माजी एअर मार्शल डॉ.अजित भोसले यांनी केले.

मुरुड येथील माळी समाज सभागृहात आयोजित ओंकार विद्या मंदिर-कनिष्ठ महाविद्यालयत इयत्ता 11 वी च्या विज्ञान शाखेचे उद्घाटन सोहळ्यात विद्यार्थी -पालक वर्गास मार्गदर्शन करताना ते बोलत होते. आपल्या भाषणात ते पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी केवळ हुशारी नाही तर चाणाक्ष ही राहिले पाहिजे. परशुरामाच्या या कोकण भूमीत चिकाटी, संयम आणि सर्मपण हा स्थायीभाव अधोरखित करण्यायोग्य आहे. यावेळी व्यासपीठावर सरखेल कान्होजी आंग्रे याचे वंशज रघुजीराजे आंग्रे, अ‍ॅड. अविनाश भिडे, हेमंत देशपांडे, संजय पगारे, मनोहर गुरव, सुनील विरकुड, दीपाली जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version