भारत वि. बांगलादेशः बांगलादेशचा प्रथम फलंदाजीचा निर्णय

। पुणे । वृत्तसंस्था ।

आयसीसी वनडे वर्ल्डकप २०२३ मध्ये भारताची लढत आज गुरुवारी बांगलादेशविरुद्ध पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर होत आहे. बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसैन शंटो याने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघ मैदानात बॉलिंगसाठी उतरलेला दिसेल.

भारताने पहिल्या तीन लढतीत विजय मिळवला असून आता रोहित शर्मा आणि कंपनी विजयाचा चौकार मारण्यास उत्सुक असेल. या उटल बांगलादेशने पहिल्या ३ पैकी २ लढती गमावल्या आहेत. अफगाणिस्तान आणि नेदरलँडने जसा धक्कादायक विजय नोंदवला होता तसा विजय नोंदवण्याचा बांगलादेशचा प्रयत्न असेल.

भारताचे 11 शिलेदार
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उप कर्णधार), रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, शार्दूल ठाकूर.
बांगलादेशचे 11 शिलेदार
लिटन दास, तन्झिद हसन, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), मेहदी हसन मिराझ, तौहीद ह्रदोय, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), महमुदुल्ला, नसुम अहमद, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, शरीफुल इस्लाम.
Exit mobile version