उभय संघामध्ये द्विदेशीर मालिका होणार?
। मुंबई । वृत्तसंस्था ।
भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट मॅच पाहण्याची जगभरात मोठी उत्सुकता असते. टी20 वर्ल्ड कपमध्ये तब्बल दोन वर्षानंतर दोन्ही देशांच्या टीम एकमेकांच्या समोर आल्या होते. ही मॅच तब्बल 167 मिलियन प्रेक्षकांनी पाहिला. टी20 क्रिकेटच्या इतिहासातील एका मॅचच्या प्रेक्षक संख्येचा हा रेकॉर्ड आहे. दोन्ही टीममधील प्रत्येक मॅच सुपर हिट असतानाही 2012-13 नंतर भारत-पाकिस्तानमध्ये एकही द्विपक्षीय सीरिज झालेली नाही.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सीरिज कधी होणार? हा प्रश्न दोन्ही देशांच्या फॅन्सना आहे. या विषयावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं महत्त्वाचं अपडेट दिलं आहे. आयसीसीचे काळजीवाहू मुख्य कार्यकारी अधिकारी ज्योफ अलार्डिस यांनी दुबईत पत्रकारांशी बोलताना भारत-पाकिस्तान सीरिजबाबत मत व्यक्त केलं आहे.
द्विपक्षीय सीरिजमध्ये आमची भूमिका नसेल. आयसीसी स्पर्धेत त्यांच्या मॅच होते त्याचा आम्हाला आनंद आहे. पण दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डातील संबंधावर आयसीसी काहीही प्रभाव टाकू शकत नाही. दोन्ही देशांचे क्रिकेट बोर्ड सहमत झाले तरच द्विपक्षीय सीरिज होऊ शकते. त्यांच्यात सहमती नसेल तर ही सीरिज होत नाही. भारत आणि पाकिस्तान या देशांमधील परिस्थिती पाहता क्रिकेट सीरिज लवकर होणे शक्य नाही असे ज्योफ यांनी स्पष्ट केले.