भारताला उंच उडी, क्लब थ्रोमध्ये तीनही पदके

| हांगझू | वृत्तसंस्था |

हांगझू येथे सुरू असलेल्या आशियाई पॅरा गेम्समध्ये भारताने उंच उडी आणि क्लब थ्रोमध्ये मोठी कामगिरी केली आहे. भारतीय पुरूष संघाने तीनही पदके आपल्या नावावर केली आहे. याचबरोबर पुरूष क्लब थ्रो एफ 5 प्रकारात प्रणव सूरमाने देखील सुवर्ण पदकाची कमाई केली. तर धरमबीर आणि अमित कुमार हे अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर राहिले.

शैलेश कुमारने आशियाई पॅरा गेम्समध्ये पुरूष उंच उडीत 1.82 मीटर उंच उडी मारत रेकॉर्ड प्रस्थापित केले. त्याने 63 प्रकारात सुवर्ण पदक पटकावले. तर भारताच्याच मरियप्पन थांगावेलूने 1.80 मीटर उंच उडी मारत रौप्य पदक पटकावले. कांस्य पदरावर देखील भारतातीच मोहर उमटली. गोविंदभाई पाधियारने 178 मीटर उंच उडी मारत कांस्य पदकावर कब्जा केला.

पुरूष क्लब थ्रो एफ 51प्रकारात सूरमाने एशियन पॅरा गेम्समध्ये 30.01 मीटर थ्रो करत रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली. त्याने सुवर्ण पदक जिंकले. तर धरमबीर 28.76 आणि अमित कुमार 26.93 लांब थ्रो करत अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान पटकावले.क्लब थ्रोमध्ये शेवटच्या चार खेळाडूंमध्ये सौदी अरेबियाचा राधी अली अलहरातीचा समावेश होता. उर्वरित तीन खेळाडू हे भारताचेच होते. सौदीचा खेळाडू 23.77 मीटर थ्रो करत चौथ्या स्थानावर राहिला. याचबरोबर भारताच्या पुरूष शूट पुट एफ 11प्रकारात मोनू घानगासने (12.33) कांस्य पदक पटकावले. महिला कॅनोए व्हीएल 2 (नौका विहार) प्रकारात प्राची यादवने 1:03.147 वेळ नोंदवत रौप्य पदक पटकावले आहे.

Exit mobile version