भारताला नेमबाजी अन्‌‍ रोईंगमध्ये रौप्य

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारताने पदकाचे खाते उघडले आहे. नेमबाजीत भारताने दिवसातील पहिले पदक जिंकले. दुसरे पदक पुरुष दुहेरी लाइटवेट स्कलमध्ये जिंकले. या दोन पदकांसह भारताने पदकतालिकेतही आपले नाव कोरले आहे. दोन्ही प्रकारात भारताने रौप्यपदकाची कमाई केली आहे.

महिलांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात नेमबाजीत भारताने पहिले रौप्यपदक जिंकले. तर, दुसरे रौप्य पदक रोईंगमध्ये जिंकले, जेथे भारतीय पुरुषांनी बाजी मारली. नेमबाजीने भारताच्या रमिता, मेहुली आणि आशी यांनी मिळून महिलांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात रौप्य पदक जिंकले. तिघींनी मिळून 1886 गुण मिळवले, ज्यामध्ये रमिताने 631.9 गुण मिळवले. मेहुलीने 630.8 तर आशीने 623.3 गुण मिळवले.

नेमबाजीत रौप्यपदक जिंकल्यानंतर अवघ्या काही वेळातच भारताला डबल स्कल्समध्ये अर्जुन सिंग आणि जाट सिंग यांनी 6:28:18 अशा वेळेसह रौप्यपदक जिंकून दिले. या स्पर्धेचे सुवर्णपदक चीनकडे गेले.

Exit mobile version