दहा हजार मीटर शर्यतीत भारताला दोन पदकं

कार्तिक कुमारला रौप्य, तर गुलवीर सिंगला कांस्य

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

आशियाई स्पर्धेमध्ये 10 हजार मीटरच्या धावण्याच्या शर्यतीत भारतीय खेळाडूंनी अंतिम सामन्यामध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर राहून रौप्य आणि कास्य पदकं नावावर केली आहेत. कार्तिक कुमार याने रौप्य तर गुलवीर सिंगने कास्य पदकावर नाव कोरले.

10 हजार मीटर शर्यतीत कार्तिक कुमारने 28:15.38 वेळेची नोंद करत रौप्यपदक नावावर केले. दुसरीकडे, गुलवीर सिंगने 28:17.21 वेळेची नोंद करत तिसऱ्या स्थानी राहून कांस्यपदक कमावले. त्यामुळे या शर्यतीत दोन भारतीयांनी पदकं नावावर केली. विशेष म्हणजे 100 मीटरची स्पर्धा शिल्लक असताना भारताच्या दोन्ही खेळाडूंनी आघाडी घेतली. आणि पदकं निश्चित केले. सुवर्ण पदकं बहारिनच्या खेळाडूने नावावर केले. बिरहानू रेमातेव बालेव याने 28:13.62 वेळ घेत सुवर्णपदकावर नाव कोरले.

Exit mobile version