। चेन्नई । वृत्तसंस्था ।
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज चेन्नईमध्ये वर्ल्डकप 2023 चा सामना रंगणार आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही संघाचा हा वर्ल्डकपमधील पहिलाच सामना असून रोहित अन् कमिन्स दोघेही आपापला संघ वर्ल्डकपची विजयी सुरूवात कशी करेल याची काळजी घेतील.
वर्ल्डकपूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत भारताने 2-1 असा विजय मिळवला होता. मात्र त्या मालिकेत दोन्ही संघातील दिग्गज खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. त्यामुळे आजच्या सामन्यातच दोन्ही संघ आपली तगडी प्लेईंग 11 घेऊन खेळणार आहेत.
चेपॉकची खेळपट्टी ही गोलंदाज आणि फलंदाज दोघांनाही पोषक असते. आजच्या सामन्यात नाणेफेकीचा कौल महत्वाचा ठरणार आहे. कारण संध्याकाळी दव देखील पडण्याची शक्यता आहे. तसेच, शुभमन गिल आजारी असल्याने त्याच्या ऐवजी इशान किशनला संधी मिळाली आहे. तो रोहितसोबत सलामी देणार हे देखील कर्णधाराने स्पष्ट केलं.
भारताची प्लेईंग 11 रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रविंद्र जाडेजा, आर. अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह ऑस्ट्रेलियाची प्लेईंग 11 डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव स्मिथ, मार्नस लाबुशेन, कॅमरून ग्रीन, एलेक्स कॅरी, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स (कर्णधार), जोश हेजलवूड, एडम जम्पा.