भारतीय हवाई दलाला मिळाला नवा ध्वज; जाणून घ्या काय आहे खासियत

। प्रयागराज । वृत्तसंस्था ।

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे हवाई दलाकडून आज ९१ वा वर्धापन दिन साजरा केला जात आहे. यानिमित्ताने परेडचे आयोजन देखील करण्यात आले होते. यावेळी हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही.आर. चौधरी यांनी परेडची सलामी स्वीकारली. तसेच त्यांच्या हस्ते परेडमध्ये हवाई दलाच्या नवीन ध्वजाचे अनावरण करण्यात आले. यासाठी हवाई दलाचा जुना ध्वज उतरवून सन्मानपूर्वक हवाई दल प्रमुखांना सुपूर्द करण्यात आला. आता हा ध्वज वायुसेना संग्रहालयात प्रदर्शित केला जाणार आहे.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात भारतीय हवाई दलाची अधिकृतरित्या 8 ऑक्टोबर 1932 रोजी स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर 1945 साली हवाई दलाच्या दर्जेदार कामगिरीमुळे हवाई दलाच्या नावात रॉयल शब्द जोडून सन्मानित करण्यात आले होते. त्यानंतर भारतीय हवाई दल हे ‘रॉयल इंडियन एअरफोर्स’ म्हणून ओळखले जाऊ लागले. मात्र 1947 मध्ये भारताला स्वतंत्र्य मिळाल्यानंतर 1950 मध्ये हवाई दलाने आपल्या नावातील ‘रॉयल’ हा शब्द काढून टाकला. तसेच हवाई दलाचा झेंडा देखील बदलण्यात आला.


आरआयएएफ ध्वजामध्ये वरील डाव्या कँटनमध्ये यूनियन जॅक आणि फ्लाय साइडवर आरआयएएफ राउंडेल (लाल, पांढरा आणि निळा) याचा समावेश होता. मात्र स्वतंत्र्यानंतर भारतीय वायुसेनेचा ध्वजामध्ये खालच्या उजव्या कँटनमध्ये यूनियन जॅकची जागा भारतीय तिरंग्याने घेतली आणि आरएएफ राउंडल्सएवजी तेथे तिरंग्याचे राउंडेल देण्यात आले.

भारतीय हवाई दलाने एका निवेदनात माहिती दिली की, भारतीय हवाई दलाची मुल्य योग्य पद्धतीने दर्शवण्यासाठी नवीन ध्वज बनवण्यात आला आहे. तसेच ध्वजाच्या वरील डाव्या कोपऱ्यात फ्लाय साइडला हवाई दल क्रेस्ट देण्यात आले आहे.

Exit mobile version