। मुंबई । वृत्तसंस्था ।
जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यातील मारवाह तालुक्यातील मछना गावाजवळ लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले आहे. अपघात झाला तेव्हा हेलिकॉप्टरमध्ये तीन जण होते.
लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टर अपघातात पायलट जखमी झाले असून त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. “जम्मू आणि काश्मीरच्या किश्तवारजवळ लष्कराचे ALH ध्रुव हेलिकॉप्टरचा अपघात झाला आहे. पायलट जखमी झाले असले तरी त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. तसेच पुढील तपास देखील सुरु आहे”