भारतीय लष्करातील निवृत्ती निलधे यांचे कर्जतमध्ये जंगी स्वागत

| नेरळ | वार्ताहर |

भारतीय लष्करातील मराठा रेजिमेंटमधील जवान निवृत्ती पंढरीनाथ निलधे हे आपली 19 वर्षाची देशसेवा पूर्ण करून आपल्या मायभूमीत कर्जत येथे पोहचले. निवृत्त जवान निवृत्ती निलधे यांची कर्जत येथून त्यांच्या मुळगाव असलेल्या टेंभरे अशी मिरवणूक काढण्यात आली.

निलधे हे कर्जत तालुक्यातील टेंभरे गावातून तरुण 2004 मध्ये भारतीय सेनेत दाखल झाले. भारतीय सेनेतील मराठा रेजिमेंटमध्ये 24 मराठा लाईट इन्फेंट्रीमध्ये त्यांनी तब्बल 19 वर्षे देशाची सेवा केली. त्यांना देशातील विविध क्षेत्रात पाठवण्यात आले होते. त्यात जम्मू काश्मीर, नॉर्थ ईस्टमध्ये आसाम, आरूणाचाल, बलवान घाटी, राजस्थान कोटा, पंजाब पठाणकोट, धर्मशाळा आदी ठिकाणी यशस्वी सेवा बजावली. त्या सेवेत निवृत्ती यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले असून, जम्मू आणि काश्मीर मिडल बार, नॉर्थ ईस्ट मिडल, ओपी रक्षक मिडल, ऑपरेशन पराक्रम मिडल या अवॉर्ड ने त्यांना सन्मानित केले आहे.

Exit mobile version