भारतीय बौद्धमहासभा कार्यकारिणी जाहीर

| वेणगाव | वार्ताहर |
भारतीय बौद्धमहासभा या संस्थेची सभा नुकतीच कर्जत दहिवली येथील बुद्धविहारात जिल्हा अध्यक्ष विजय गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यामध्ये तालुका कार्यकारिणीची नव्याने निवड करण्यात आली. नवीन कार्यकारिणीमध्ये तालुका अध्यक्ष कृणाल माने, सरचिटणीस भरत देसाई,कोषाध्यक्ष राहुल गायकवाड,संस्कार उपाध्यक्ष प्रकाश गायकवाड, संस्कार सचिव सचिन वाशिकार ,संस्कार सचिव राजू ढोले, संरक्षण उपाध्यक्ष विक्की जाधव,संरक्षण सचिव राहुल बनकर,सचिव योगेश गायकवाड,प्रचार पर्यटक उपाध्यक्ष संतोष सोनवणे, सचिव ललित हिरे, पर्यटक सचिव-अमित गायकवाड, ऑडिटर – दगडू जाधव, कार्यालयीन सचिव संजय पंडित, महिला अध्यक्ष, हिराबाई हिरे, महिला सचिव शारदा वाघमारे, संघटक अनिकेत गायकवाड,मदन भागोजी गायकवाड ,नामदेव कांबळे,नितीन नामदेव जाधव आदींचा समावेश आहे. सुशील वाघमार, विजय कांबळे, कोषाध्यक्ष, उषाताई कांबळे, राजेश भालेराव, गणेश कांबळे, अ‍ॅड. कैलास मोरे, धर्मेंद्र मोरे,हरिश्‍चंद्र यादव , सुनील गायकवाड आदींनी कार्यकरणीला शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version