भारतीय हॉकी संघ नव्या अवतारात

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

भारतीय हॉकी संघ 26 जुलैपासून सुरू होणार्‍या पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी तयारी करत आहे. यासाठी भारताचा 19 सदस्यीय संघ सराव सामन्यांसाठी स्वित्झर्लंडला रवाना झाला आहे. तेथे ते ऑलिम्पिकसाठी मानसिक शक्ती आणि शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी सराव करतील. संघ तेथे काही सराव सामनेही खेळणार आहे. आता पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी भारतीय हॉकी संघाच्या अधिकृत जर्सीचे अनावरण करण्यात आले आहे. भारतीय पुरुष हॉकी संघाने 6 जुलै रोजी बंगळुरू येथील भारतीय क्रीडा प्राधिकरण कॅम्पसमध्ये पॅरिस ऑलिम्पिकसाठी आपल्या अधिकृत जर्सीचे अनावरण केले आहे. खेळाडूंनी ऑलिम्पिक रिंगसमोर ही जर्सी परिधान करून पोझ दिली. यावेळी संघाचे मुख्य प्रशिक्षक क्रेग फुल्टन, कर्णधार हरमनप्रीत सिंग, स्ट्रायकर मनदीप सिंग यासह इतर खेळाडू उपस्थित होते.

Exit mobile version