नीरज चोप्रा याची चमकदार कामगिरी

दोहा डायमंड लीगचं विजेतेपद नीरज चोप्रानं पटकावलं

। मुंबई । वृत्तसंस्था ।

भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रानं नव्या मोसमाची शानदार सुरुवात केली आहे. नीरज चोप्रानं 5 मे (शुक्रवार) रोजी दोहा डायमंड लीगचं विजेतेपद पटकावलं आहे. दोहाच्या कतार स्पोर्ट्स क्लबमध्ये झालेल्या स्पर्धेत नीरजनं पहिल्याच प्रयत्नात 88.67 मीटरवर भाला फेकला. नीरजचा हा पहिला फेक स्पर्धेतील सर्वोत्तम थ्रो ठरला. दरम्यान, या स्पर्धेतही नीरज त्याच्या नव्या विक्रमापासून दूर राहिल्याचं पाहायला मिळालं. नीरज पुन्हा एकदा 900 मीटरचा अडथळा पार करण्यात अयशस्वी ठरला.

निरज चोप्राची वैयक्तिक सर्वोत्कृष्ट कामगिरी 89.94 मीटर आहे, जो राष्ट्रीय विक्रमही आहे. 2018 मध्ये दोहा डायमंड लीगमधील त्याच्या एकमेव सहभागामध्ये 2018 मध्ये 87.43m सह चौथे स्थान मिळवलं. ‘एकूण फिटनेस आणि ताकद’ नसल्यामुळे नीरज गेल्या वर्षी दोहा डायमंड लीगला मुकला होता. गेल्या सप्टेंबरमध्ये झुरिचमध्ये 2022 ग्रँड फिनाले जिंकल्यानंतर डायमंड लीग चॅम्पियन बनणारा तो पहिला भारतीय ठरला. एक महिन्यापूर्वी, तो लुझने येथे डायमंड लीग स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय ठरला होता.

दोहा डायमंड लीगमधली नीरज चोप्राची कामगिरी :

पहिला प्रयत्न : 88.67 मीटर
दुसरा प्रयत्न : 86.04 मीटर
तिसरा प्रयत्न : 85.47 मीटर
चौथा प्रयत्न : फाउल
पाचवा प्रयत्न : 84.37 मीटर
सहावा प्रयत्न : 86.52 मीटर

Exit mobile version