| कीव | वृत्तसंस्था |
युक्रेनमधील खारकीव्ह शहरात रशियानं केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. परराष्ट्र मंत्रालयानं या वृत्ताला दुजोरा दिला आहे. नवीन शेखरप्पा (वय 21) असं या विद्यार्थ्याचं नाव असून तो कर्नाटकचा रहिवासी आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे अरिंदम बागची म्हणाले, आम्हाला सांगायला अतिशय वाईट वाटतंय की सकाळी खारकीव्ह शहरात झालेल्या बॉम्ब हल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागला आहे. परराष्ट्र मंत्रालय या विद्यार्थ्याच्या कुटुंबियांच्या संपर्कात आहे. परराष्ट्र सचिव रशिया आणि युक्रेनच्या राजदूतांना फोन केला असून खारकीव्ह सह इतर डेंजर झोनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुखरुप व्यवस्था करावी.
युक्रेनमध्ये सध्या अनेक भारतीय विद्यार्थी अडकून पडले आहेत. दरम्यान, आत्तापर्यंत अनेक विमानांद्वारे भारतात सुखरुप परत आणण्यात आलं आहे.