दक्षिण आफ्रिकेने घेतला पुन्हा फलंदाजीचा निर्णय
| गुवाहाटी | वृत्तसंस्था |
भारत आणि दक्षिण आफ्रिका दुसऱ्या कसोटीचा आज तिसरा दिवस असून भारतीय संघ फलंदाजीला उतरला आहे. दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना 489 धावांचा डोंगर उभारला आहे. प्रत्युत्तरात भारतीय संघ 201 धावांवर सर्वबाद झाला असून द. आफ्रिकेचा संघ दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरत आहे आणि त्यांच्याकडे 288 धावांची भक्कम आघाडी आहे. भारतीय संघ गुवाहाटी कसोटीतील पहिल्या डावात 83.5 षटकांत 201 धावा करत सर्वबाद झाला. भारताकडून यशस्वी जैस्वालने 48 धावा, वॉशिंग्टन सुंदरने 48 धावांची खेळी केली. तर कुलदीपने 134 चेंडू खेळत 19 धावा केल्या आणि सुंदरला चांगली साथ दिली. त्यामुळे भारताने 200 धावांचा टप्पा गाठला. भारत ऑलआऊट झाल्यानंतर आता दक्षिण आफ्रिका दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरणार असल्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. यासह द.आफ्रिकेकडे आता 288 धावांची आघाडी आहे.
कुलदीप यादव व सुंदरची उत्कृष्ट भागीदारी तुटल्यानंतर कुलदीपही बाद होत माघारी परतला. कुलदीपने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील चेंडूंच्या तुलनेत मोठी खेळी केली. कुलदीपने कमालीची डिफेन्स करत 134 चेंडू खेळला ज्यामध्ये त्याने 3 चौकारांसह 19 धावा केल्या. सध्याच्या घडीला बुमराह व सिराजची जोडी मैदानावर आहे. भारताला आता फॉलोऑन टाळण्यासाठी 89 धावांची गरज असताना वॉशिंग्टन सुंदर व कुलदीप यादव यांची 72 धावांची भागीदारी तुटली आहे. हार्मरने सुंदरला झेलबाद करत भारताला मोठा धक्का दिला.
मार्को यान्सनच्या बाऊन्सरवर रवींद्र जडेजा झेलबाद झाला. यान्सनने बाऊन्सर टाकला जो जडेजाच्या खांद्याला लागला, पण खांद्याला लागून तो बॅटला लागल्याने जडेजाला तिसऱ्या पंचांनी झेलबाद दिलं. मार्को यान्सनने ऋषभ पंतनंतर नितीश रेड्डी झेलबाद झाला आहे. मारक्रमने हवेत झेप घेत उत्कृष्ट झेल टिपला आणि यासह नितीश रेड्डी 10 धावा करत बाद झाला. यासह भारताने 120 धावांवर सहावी विकेट गमावली. टी ब्रेकनंतर दुसऱ्याच षटकात यान्सनच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात ऋषभ पंत झेलबाद झाला. यशस्वीनंतर साई सुदर्शन 35व्या षटकात हार्मरच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. तर 36व्या षटकात ध्रुव जुरेल खराब फटका खेळत झेलबाद झाला. यासह भारताला झटपट 4 धक्के बसले.यशस्वी जैस्वालने अर्धशतक केल्यानंतर हार्मरच्या गोलंदाजीवर तो झेलबाद झाला. 58 धावांवर बाद झाल्याने भारताचे दोन्ही सलामीवीर माघारी परतले. यशस्वी जैस्वालने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध कसोटीत पहिलं अर्धशतक झळकावलं आहे. यशस्वीने 85 चेंडूत 6 चौकार व 1 षटकारांसह अर्धशतक पूर्ण केलं.
केशव महाराजने 65 धावांची भागीदारी तोडत केएल राहुलला स्लिपमध्ये झेलबाद केलं आहे. 22व्या षटकात राहुल 22 धावांच्या स्कोअरवर झेलबाद झाला. केएल राहुल यशस्वी जैस्वाल यांनी दुसऱ्या दिवसाच्या खेळाअखेरीस 9 धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेच्या शेपटाने दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांची चांगलीच शाळा घेतली. सेनुरन मुथुसॅमी 206 चेंडूत 10 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने 109 धावांची उत्कृष्ट खेळी करत संघाला मजबूत स्थितीत आणलं. मुथुसॅमी व वेरेन यांनी 88 धावांची भागीदारी केली. तर मुथुसॅमी व मार्को यान्सन यांनी 97 धावांची भागीदारी रचली. यान्सनने 91 चेंडूत 6 चौकार व 7 षटकारांच्या मदतीने 93 धावांची अफलातून खेळी केली. यासह दक्षिण आफ्रिका संघाने 151 षटकांत 489 धावा केल्या. तर भारताकडून पहिल्या डावात कुलदीप यादवने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर जडेजा, बुमराह, सिराज यांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या.
तत्पुर्वी, दक्षिण आफ्रिकेने पहिल्या दोन दिवस फलंदाजी करताना पहिल्या डावात 15.1 षटकात सर्वबाद 489 धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेकडून सेनुरन मुथुसामीलाने 206 चेंडूत 109 धावा केल्या. तसेच मार्को यान्सिनने 91 चेंडूत 93 धावा केल्या. याशिवाय ट्रिस्टन स्टब्सने 49 धावा, तेंबा बावुमाने 41 धावा आणि काईन वेरेयनने 45 धावांची खेळी केली. भारताकडून कुलदीप यादवने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या, तर जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.







