| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
टोकियो ऑलिंपिकमध्ये ऐतिहासिक कांस्यपदक पटकावलेल्या भारतीय पुरुष हॉकी संघाची आगामी पॅरिस ऑलिंपिकसाठी घोषणा बुधवारी करण्यात आली. अनुभवी खेळाडू हरमनप्रीत सिंग याच्याकडे भारतीय हॉकी संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हार्दिक सिंग हा भारतीय हॉकी संघाचा उपकर्णधार असणार आहे..भारतीय हॉकी संघ सध्या बंगळूर पॅरिस ऑलिंपिकची तयारी करीत आहे. पी. आर. श्रीजेश, मनप्रीत सिंग यांचे हे चौथे ऑलिंपिक असणार आहे, तसेच कर्णधार हरमनप्रीत सिंग तिसऱ्यांदा ऑलिंपिकमध्ये सहभागी होणार आहे. रुपेंदरपाल सिंग व बिरेंद्र लाक्रा हे खेळाडू निवृत्त झाले आहेत.
भारतीय हॉकी संघ गोलरक्षक - श्रीजेश पी. आर., बचावपटू - जरमनप्रीत सिंग, अमित रोहिदास, हरमनप्रीत सिंग, सुमीत, संजय. मधली फळी - राजकुमार पाल, शमशेर सिंग, मनप्रीत सिंग, हार्दिक सिंग, विवेक सागर प्रसाद. आक्रमक फळी - अभिषेक, सुखजीत सिंग, ललितकुमार उपाध्याय, मनदीप सिंग, गुर्जंत सिंग. पर्यायी खेळाडू - नीलकांता शर्मा, जुगराज सिंग, क्रिशन बहादूर पाठक
पाच खेळाडू पहिल्यांदाच खेळणार भारताच्या हॉकी संघातील पाच खेळाडू पहिल्यांदाच ऑलिंपिकमध्ये सहभागी होणार आहेत. यामध्ये जरमनप्रीत सिंग, संजय, राजकुमार पाल, अभिषेक व सुखजित सिंग या पाच खेळाडूंचा समावेश आहे.
हॉकी स्पर्धेची गटवारी अ - नेदरलँड्स, जर्मनी, ग्रेटब्रिटन, स्पेन, फ्रान्स, दक्षिण आफ्रिकाब - बेल्जियम, भारत, ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना, न्यूझीलंड, आयर्लंड.