। डर्बन । वृत्तसंस्था ।
भारतीय संघाला रविवारी (दि.3) न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेत 3-0 अशा लाजीरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. हा पराभव होत असतानाच भारताचा टी-20 संघ दक्षिण आफ्रिकेला रवाना झाला आहे. दक्षिण आफ्रिका दौर्यात भारतीय संघाला सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात 4 सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ डर्बन येथे पोहचला असून बीसीसीआयने त्याचा व्हिडिओही शेअर केला आहे. यावेळी प्रभारी प्रशिक्षक म्हणून व्हीव्हीएस लक्ष्मण भारतीय संघासोबत दक्षिण अफ्रिका दौर्यावर गेल्याची माहिती मिळत आहे. भारताचा नियमित मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि त्याचा सपोर्ट स्टाफ भारतीय कसोटी संघाच्या आगामी ऑस्ट्रेलिया दौर्याच्या तयारीत व्यस्त असणार आहे, यामुळे लाक्ष्मण भारताच्या टी-20 संघासह दक्षिण आफ्रिका दौर्यावर गेल्याचे कळत आहे.
दरम्यान भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 8 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान टी-20 मालिका खेळायची आहे. या मालिकेतील पहिला सामना डर्बनला होईल, तर नंतर भारताला गकेबेहरा, सेंच्युरियन आणि जोहान्सबर्ग येथे सामने खेळायचे आहेत. हे सर्व सामने भारतीय वेळेनुसार रात्री 9.30 वाजता चालू होणार आहेत.
भारताचा संघः- सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, तिलक वर्मा, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, विजयकुमार विशक, आवेश खान, यश दयाल.
दक्षिण आफ्रिकेचा संघः- एडन मार्करम, ओटनेल बार्टमन, गेराल्ड कोएत्झी, डोनोव्हन फेरेरा, रिझा हेंड्रीक्स, मार्को यानसेन, हेनरिच क्लासेन, पॅट्रीक क्रूगर, केशव महाराज, डेव्हिड मिलर, मिहलाली एमपोंगवाना, एनकाबा पीटर, रियान रिकेल्टन, एंडिले सिमेलन, लुथो सिपाम्ला, त्रिस्तान स्तब्स.