तीन सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर

| मुंबई | वृत्तसंस्था |

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने इंग्लंडविरुद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटच्या 3 सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. पहिल्या दोन सामन्यांनंतर मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. या सामन्यात विराट कोहली उर्वरित तीन सामन्यांसाठीही उपलब्ध नाही. तो वैयक्तिक कारणांमुळे उपलब्ध नसल्याचं बीसीसीआयने म्हटले आहे. तसेच, रवींद्र जडेजा आणि के.एल. राहुल यांचे संघात पुनरागमन झाले आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा सामना 15 फेब्रुवारीपासून खेळला जाणार आहे. राजकोटमध्ये हा सामना होईल. यानंतर चौथा सामना रांचीमध्ये 23 फेब्रुवारीपासून खेळला जाणार आहे. तर मालिकेतील कसोटी सामना 7 मार्चपासून धर्मशाला येथे होणार आहे.

तीन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ : 
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, के.एल. राहुल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), आर अश्‍विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप.
Exit mobile version