भारतीय संघाला मिळाला नवा बॉलिंग कोच

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

गौतम गंभीर टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी विराजमान झाल्यानंतर गोलंदाज प्रशिक्षक कोण असणार, याची उत्सुकता होती. श्रीलंका दौऱ्यात तात्पुरती जबाबदारी साईराज बहुतुले यांच्याकडे सोपण्यात आली होती. आता गंभीरच्या संघात नव्या गोलंदाज प्रशिक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे.

टी-20 विश्वचषकानंतर पारस म्हाब्रेचा कार्यकाळ संपला होता. त्यानंतर श्रीलंका दौऱ्यात साईराज बहुतुले यांच्याकडे तात्पुरती जबाबदारी सोपवण्यात आली होती. भारतावच्या गोलंदाज प्रशिक्षकपदी विनय कुमार आणि झहीर खान यांचे नाव चर्चेत होते. पण या दोन नावांवर मात करत दक्षिण अफ्रिकेचा दिग्गज वेगवान गोलंदाज मोर्ने मॉर्केलने बाजी मारली आहे.

भारताचे नवे गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मॉर्केल 1 सप्टेंबरपासून आपली जबाबदारी स्वीकारणार आहे. यापूर्वी मॉर्केल पाकिस्तान संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक राहिला आहे. तसेच, आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्ससोबत मोर्ने मॉर्केलने काम केले आहे.

Exit mobile version