भारतीय संघाने पाकिस्तानात यावे, अन्यथा भरपाई द्यावी

पाकिस्तान क्रिकेट मंडळाची मागणी


| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

राजकीय आणि सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानमध्ये 2025 मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सहभागी होण्यास नकार दिल्यास आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) केली आहे.

भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानमध्ये 2025 मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सहभागी होण्यास नकार दिल्यास आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) केली आहे, तसेच चॅम्पियन्स ट्रॉफी 2025च्या यजमानपदाच्या करारपत्रावर स्वाक्षरी करावी यासाठीही पीसीबीने आग्रह धरला आहे. पीसीबीच्या सूत्रांनी रविवारी एका वृत्तसंस्थेला सांगितले की, आयसीसीने पाकिस्तानला यजमान म्हणून निवडले आहे; पण आयसीसीने आतापर्यंत यजमानपदाच्या करारावर स्वाक्षरी केलेली नाही. पीसीबी अध्यक्ष जका अशरफ आणि मुख्य परिचालन अधिकारी सलमान नसीर यांनी 2025 मध्ये फेब्रुवारी-मार्चमध्ये पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या यजमानपदाबाबत चर्चा करण्यासाठी अहमदाबादमध्ये आयसीसीच्या कार्यकारी मंडळाची भेट घेतली होती, असा खुलासाही या सूत्राने केला आहे.

Exit mobile version