| मुंबई | वृत्तसंस्था |
टी-20 विश्वचषक 2024 मध्ये सर्वच संघ पावसामुळे हैराण झाले आहेत. बहुतांश सामन्यांवर पावसाचे सावट स्पष्टपणे दिसून आले आहे. भारतीय संघाचा आज बांगलादेश विरुद्ध सामना अँटीगा येथे होणार आहे. भारतीय संघाला या सामन्याच्यावेळी पावसापेक्षा हवेची जास्त चिंता करावी लागणार आहे. दक्षिण आफ्रिकेपासून इंग्लंडच्या खेळाडूंनी वेस्ट इंडिजमधील सामन्यात हवा महत्त्वाचा फॅक्टर असल्याच म्हटले आहे. हवेची दिशा समजून घेणं गरजेच आहे. त्या विरोधात जाणे म्हणजे पराभवाला निमंत्रण देण्यासारख आहे. मग पावसाच काय? असा प्रश्न येतो. अँटीगामधील ताज्या हवामानानुसार, पाऊस खेळ बिघडवण्याची शक्यता फार कमी आहे. बारबाडोसमध्ये भारतीय संघाने अफगाणिस्तान विरुद्ध सुपर-8 च्या पहिल्या सामन्यात विजय मिळवला. त्यानंतर भारतीय संघ थेट अँटीगाला रवाना झाला आहे. तिथे पोहोचल्यानंतर 21 जूनला सरावसुद्धा केला आहे. त्यावेळी हवामान स्वच्छ होते. प्रश्न हा आहे की, सामन्याच्या दिवशी अँटीगाच हवामान कस असेल?. भारतीय संघ नशिबवान आहे. कारण आतापर्यंत झालेल्या वर्ल्ड कपच्या सामन्यात खराब हवामानाचा त्यांना फटका सहन करावा लागलेला नाही. पुढची आव्हान लक्षात घेता, खराब हवामान वाट्याला येऊ नये, हाच भारतीय संघाचा प्रयत्न असेल.
पावसाची शक्यता किती? भारत-बांग्लादेश सामना स्थानिक वेळेनुसार, सकाळी 10.30 वाजता सुरु होईल. एक्यूवेदर डॉट कॉमनुसार त्यावेळी सौम्य पाऊस कोसळू शकतो. याची शक्यता 50 टक्के आहे. त्यावेळी आकाश स्वच्छ आणि सूर्य प्रकाश असेल. म्हणजे अँटीगामध्ये भारत-बांग्लादेश सामन्यावेळी पाऊस कोसळला, तरी त्यामुळे सामना रद्द करण्याची वेळ येणार नाही.