भारतीय संघाचा विश्वविक्रम

टी-20 इतिहासात अशी कामगिरी करणारा जगातील पहिला संघ

| गुवाहाटी | वृत्तसंस्था |

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील गुवाहाटीमधील टी-20 सामन्यात टीम इंडियाचा दबदबा पाहायला मिळाला. टीम इंडियाने 8 विकेट्सने तिसरा सामना जिंकत मालिकेत 3-0 अशी अभेद्य आघाडी मिळवली. यासह टीम इंडियाने वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केला.

भारतीय संघाने न्यूझीलंडने दिलेलं 154 धावांचं लक्ष्य अवघ्या 10 षटकांत गाठलं. यासह भारताने 60 चेंडू शिल्लक ठेवत टी-20मधील सर्वात मोठा विजय नोंदवला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाने घरच्या मैदानावर सलग 10वी टी-20 मालिका जिंकली आहे. भारतीय संघाने घरच्या मैदानावर सलग 10वी टी 20 मालिका जिंकली आहे. भारतीय संघ पहिल्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर आहे, ज्याने घरच्या मैदानावर सलग आठ टी-20 मालिका जिंकल्या आहेत.

घरच्या मैदानावर सर्वाधिक सलग मालिका विजय
© 10 मालिका विजय भारत (2022-26)
© 8 मालिका विजय ऑस्ट्रेलिया (2006-10)
© 7 मालिका विजय भारत (2019-22)
© 5 मालिका विजय पाकिस्तान (2008-18)
सर्वाधिक चेंडू शिल्लक ठेवत 150 अधिक धावांचं लक्ष्य गाठणारे संघ (पूर्ण सदस्य संघ)
© 60 चेंडू: भारत विरुद्ध न्यूझीलंड, गुवाहाटी, 2026
© 37 चेंडू: वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका, किंग्स्टन, 2024
© 33 चेंडू: इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान, लाहोर, 2022
© 32 चेंडू: दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड, जोहान्सबर्ग, 2016
भारतीय संघाचा वर्ल्ड रेकॉर्ड
टीम इंडियाने 154 धावांचे लक्ष्य फक्त 60 चेंडूत पूर्ण करून वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात पूर्णवेळ खेळणाऱ्या देशाविरुद्ध पूर्णवेळ खेळणाऱ्या देशाने केलेला 150 पेक्षा जास्त धावांचा हा सर्वात जलद पाठलाग आहे. भारतीय संघ हा सर्वाधिक चेंडू शिल्लक ठेवत एखाद्या संघाविरूद्ध विजय मिळवणारा पहिला संघ ठरला आहे.
Exit mobile version