भारतीय पर्यटकांचा व्हिएतनाममध्ये मृत्यू

| नवी दिल्ली |वृत्तसंस्था |

व्हिएतनाममधील प्रसिद्ध फू क्वोक बेटाजवळ भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी स्पीडबोट समुद्रात उलटली. यात 15 भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला, तर 21 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली. बोटीत एकूण 36 प्रवासी होते.

स्थानिक प्रशासनाच्या माहितीनुसार, समुद्रातील तीव्र लाटांमुळे हा अपघात झाला. दुर्घटनेनंतर नौदल, कोस्ट गार्ड आणि बचाव पथकांनी तातडीने शोध व बचाव मोहीम राबवून सर्व प्रवाशांना किनाऱ्यावर आणले. मृतांमध्ये 13 पुरुष आणि 2 महिलांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे.

या घटनेनंतर भारतीय दूतावासाने मदत आणि माहितीसाठी हेल्पलाईन सुरू केली असून, मृतांची ओळख पटविण्याची व त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Exit mobile version