। दक्षिण कोरिया । वृत्तसंस्था ।
ड्रॅग-फ्लिकर गुरजीत कौरच्या पाच गोलच्या जोरावर भारतीय महिला हॉकी संघाने रविवारी आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात थायलंडचा 13-0 असा दणदणीत पराभव केला. टोकियो ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर भारतीय हॉकी संघ पहिल्यांदाच मैदानात उतरला. या सामन्यात सविता पुनिया संघाची कर्णधार होती.
गुरजीतने सामन्याच्या दुसर्याच मिनिटाला पेनल्टी स्ट्रोकचे गोलमध्ये रूपांतर केले, तर पाच मिनिटांनंतर वंदना कटारियाने दुसरा गोल नोंदवला. पहिल्या क्वार्टरच्या अखेरीस लिलिमा मिन्झने 14 व्या मिनिटाला भारताचा तिसरा गोल केला, तर गुरजीत आणि ज्योती यांनी 14व्या आणि 15व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करत स्कोअर 5-0 असा केला. दुसर्या क्वार्टरमध्येही भारतीय महिला हॉकी संघाने वर्चस्व कायम राखले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणार्या राजविंदर कौरने 16 व्या मिनिटाला मैदानी गोल केला, तर गुरजीतने 24 व्या मिनिटाला वैयक्तिक तिसरा गोल केला. काही वेळातच लिलिमाने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रुपांतर केले.
महत्वाची गोष्ट म्हणजे टोकियो ऑलिम्पिक 2020 स्पर्धेत चौथ्या क्रमांकावर राहिल्यानंतर भारतीय संघाचा हा पहिलाच सामना होता. नियमित कर्णधार राणी रामपालला या स्पर्धेतून विश्रांती देण्यात आली आहे. तिच्या अनुपस्थितीत गोलरक्षक सविता पुनियाकडे संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे.