भारतीय महिला हॉकी संघ उपांत्य फेरीत

पात्रता फेरीतील ब गटातील यजमान

| रांची | वार्ताहर |

यजमान भारतीय महिला हॉकी संघाने येथे सुरू असलेल्या पॅरिस ऑलिंपिक पात्रता फेरीतील ब गटातील साखळी फेरीच्या अखेरच्या लढतीत इटलीचा 5-1 असा धुव्वा उडवला आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला. या स्पर्धेमध्ये अव्वल तीन स्थानांवर येणारे देश थेट पॅरिस ऑलिंपिकसाठी पात्र ठरणार आहेत. त्यामुळे आता भारतीय महिला हॉकी संघाच्या ऑलिंपिक प्रवेशाचा आशा उंचावल्या आहेत.

भारताचा इटलीविरुद्धचा सामना अत्यंत महत्त्वाचा होता. पहिल्या मिनिटालाच उदिताने पेनल्टी कॉर्नरवर गोल करीत भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर 40 मिनिटांपर्यंत दोन्ही देशांना गोल करता आले नाहीत. दीपिकाने पेनल्टी स्ट्रोकवर भारतासाठी दुसरा गोल केला. सलीमा टेटे हिने 45 व्या मिनिटाला अप्रतिम फिल्ड गोल करीत भारताचे वर्चस्व प्रस्थापित केले. नवनीत कौरने 53 व्या मिनिटाला चौथा गोल केला. उदिताने 55 व्या मिनिटाला स्वत:चा दुसरा व संघाचा पाचवा गोल करीत भारतीय संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

Exit mobile version